गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या संत एकनाथ रंग मंदिराच्या विकासकामांना गती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी काल येथील कामांची पाहणी केली.संत एकनाथ रंग मंदिराच्या दुरुस्तीसाठी शहरात मोठ्या स्वरूपात जनआंदोलन उभे राहिले होते. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी 10 ऑगस्ट रोजी येथील कामाची पाहणी करुन 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
आतापर्यंत अनेक वेळा या रंगमंदिराची दुरावस्था दूर करण्यासाठी लाखोंचे कंत्राट निघाले. तरीही परिस्थिती काही सुधरलेली नाही. वेळोवेळी निघणार्या कंत्राटांमुळे रंगमंदिर नाही, तर चक्क कंत्राटदार आणि नगरसेवकांचा फायदा झाला असे आरोप झाले आहेत.प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी 30 सप्टेंबर पर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे काल संत एकनाथ रंगमंदिर नुतनीकरण कामाचा आढावा मनपा शहर अभियंता एस. डी. पानझडे घेतला. त्यावेळी विद्युत विभाग प्रमुख ए.बी. देशमुख,उपअभियंता के.डी. देशमुख,शाखा अभियंता नाना पाटिल,आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे , हिमांशु देशपांडे तसेच नाट्यकर्मी राजू परदेशी,सोनार कंत्राटदार दराडे,काझी, रईस, आदी उपस्थित होते . यावेळी पानझडेंनी कंत्राटदारांना सूचना दिल्या.